Posts

प्रत्येकाकडून शिकावे !!!

  प्रत्येकाकडून शिकावे !!! इतिहासात अनेक व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. काही पराक्रमी, शूर, उदार व सद्गुणी होती, तर काही क्रूरकर्मा आणि कपटी अशीही होती. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे औरंगजेब. संत महात्मा म्हणतात, प्रत्येकामध्ये ईश्वराने कोणता ना कोणता सद्गुण भरलेला आहे. म्हणून प्रत्येकाकडून काहीना काही शिकण्यासारखे आहे. सद्गुरु माताजींनी देखील म्हटले आहे, की 'कणकण से शिक्षा' तर मग या औरंगजेबाकडून अशी कोणती गोष्ट आपल्याला शिकता येण्यासारखी आहे?   औरंगजेब जसा मुत्सद्दी आणि क्रूरपणाबद्दल प्रसिद्ध होता तसा तो साधी राहणी व धार्मिकपणा याबद्दल देखील प्रसिद्ध होता; त्याच्यात धार्मिकता जरी असली तरी धर्मांधता अधिक असल्यामुळे तो इतिहासात कुप्रसिद्ध झाला. औरंगजेब नियमितपणे नमाज अदा करत असे. रोज वेळेवर मशिदीत जाऊन नमाज पढणे हा त्याचा कार्यक्रम होता. एके दिवशी काही कारणाने त्याला मशिदीत यायला उशीर झाला. जेव्हा तो मशिदीत शिरला तेव्हा बादशहा आलेला आहे हे कळताच अगोदर आलेले लोक उठू लागले व बादशहाला जागा देऊ लागले; पण औरंगजेब बादशाह त्यांना नम्रपणे म्हणाला, "कोणीही उठू नका, कारण तुम्ही माझ्या आ...