Posts

दृष्टी

Image
  दृष्टी   एका गावात सदानंद नावाचा एक अंध तरुण राहत होता. नेहमीच्या सवयीने तो गावात सहजपणे हिंडू फिरु शकत असे. एकदा गावातील परोपकारी सज्जनांनी सदानंदाला शहरात नेऊन त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्याचे ठरवले; परंतु सदानंदाने ठाम नकार दिला. तो म्हणाला, आतापर्यंत डोळ्यांवाचून माझं काही अडलं नाही. यापुढेही काही अडून राहणार नाही. एके दिवशी सदानंद गावापासून जवळच राहत असलेल्या आपल्या मित्राकडे गेला. संध्याकाळी त्याला घरी परतायचे होते; परंतु आता लवकरच काळोख पडेल म्हणून मित्राने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जा म्हणून सांगितले. त्यावर सदानंद मित्राला म्हणाला, “मला एक कंदिल पेटवून दे.... मित्र म्हणाला,”.... पण तुला त्या कंदिलाच्या प्रकाशाचा काय उपयोग ? तू तर दिवसा उजेडातही पाहू शकत नाहीस.”  सदानंद म्हणाला, "मित्रा, तू म्हणतोस ते खरय. पण माझ्याजवळचा पेटता कंदिल पाहून रात्रीच्या अंधारात समोरुन येणारी व्यक्ती तरी मला घडकणार नाही. " मित्राला त्याचे म्हणणे पटले. सदानंद जळता कंदिल घेऊन निघाला. पुढे अचानक त्याला एका माणसाचा धक्का लागला आणि तो खाली पडला. सदानंदाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, "ब

निसर्गाकडून शिकावे

Image
  निसर्गाकडून शिकावे एक संत महात्मा आपल्या शिष्यासोबत एका जंगलामधून जात होता. चालता चालता ते एका उंच टेकडीवर आले. त्याच वेळी शिष्याचा पाय घसरला आणि तो घसरत घसरत दरीमध्ये पडू लागला. तेवढ्यात त्याच्या हातात एक बांबूचं झुडुप लागलं. त्या बांबूच्या छोट्या झुडपाला त्याने घट्ट पकडून ठेवलं. त्यामुळे तो दरीत पडता पडता वाचला. कारण बांबू लवचिक असल्यामुळे तो वाकला; परंतु मोडला नाही किंवा जमिनीतून उपटून निघाला नाही. त्यामुळे तो शिष्य कितीतरी वेळ तसाच लटकत राहू शकला. थोड्या वेळातच गुरुदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी त्याला हाताचा आधार देत वर खेचून घेतले. पुढे दोघेही चालू लागले. चालता चालता गुरुदेवांनी त्याला विचारले, “बाळ! ज्या बांबूने तुझा प्राण वाचवला तो बांबू तुला काही म्हणाला का?" शिष्य म्हणाला, “नाही गुरुदेव, कदाचित माझे प्राण संकटात असल्यामुळे मी लक्ष दिलं नसेल आणि दुसरं म्हणजे झाडाझुडपांची भाषादेखील मला येत नाही तेव्हा आपणच सांगावे.” गुरुदेव मंदस्मित करत म्हणाले, “बाळ! दरीत पडता-पडता तू ज्या बांबूला पकडलं होतं, तो पूर्णपणे वाकलेला होता. तरीही त्याने आपली जागा न सोडता तुला आधार दिला आणि तुझा

मानवता हाच खरा धर्म

Image
 मानवता हाच खरा धर्म प्रसिद्ध हिंदी लेखक आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या जीवनातील हा एक प्रसंग आहे. त्या काळात जातिभेद, शिवा-शिव, उच्चनीचता, कर्मकांड या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाई; परंतु आचार्य जरी ब्राह्मण कुळात जन्मलेले असले तरी ते हे सर्व भेदभाव मानत नसत. त्यांच्या मते मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. एकदा ते आपल्या शेतातून घरी जात असताना त्यांना वाटेत एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर त्यांना दिसून आले, की शेतात मजुरी करणारी एक अस्पृश्य महिला रडत-ओरडत बेशुद्ध होऊन पडली. ते त्या महिलेजवळ गेले. तेव्हा त्यांनी पाहिले, की एक विषारी साप चावून निघून गेला होता. त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्या महिलेच्या पायाला जिथे सापाने दंश केला होता त्याच्या वरच्या भागात हाताने घट्ट दाबून धरले. विष शरीरात पसरु नये म्हणून घट्ट दाबून धरले; पण असे किती वेळ धरुन ठेवणार? पायाला बांधून ठेवण्यासाठी कुठे दोरीही दिसेना. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या गळ्यातले जानवे काढून त्या महिलेच्या पायास घट्ट आवळून बांधले. विषाचा प्रभाव पुढे वाढत गेला नाही. तेवढ्यात इतर

दैवी सद्गुणांचा सुगंध

Image
  दैवी सद्गुणांचा सुगंध सुगंधी फुलं कुठेही ठेवली, तरी ती सुगंधच पसरवतात. तशी सदगुणी माणसं कुठेही गेली, तरी ती आपले सद्गुणच पेरत असतात. एकदा गुरु नानकदेवजी महाराज बाला आणि मर्दाना या आपल्या दोन शिष्यांसोबत पश्चिम बंगालच्या यात्रेवर निघाले होते. वाटेत त्यांना एक गाव लागले. रात्र इथंच घालवावी व दुसऱ्या दिवशी सकाळी पुढे जावे असे ठरवून ते एका झाडाखाली पारावर थांबले. दिवसभर चालून थकल्यामुळे त्यांना भूकही लागली होती. त्या गावात कुठे निवारा मिळेल का, म्हणून चौकशी केली; पण कोणीही त्यांना थारा दिला नाही. उलट त्यांना वाईट-साईट बोलून हाकलून दिले. ती रात्र त्यांनी उपाशीपोटी पारावरच घालवली. सकाळी उठल्यावर गुरु नानक देवांनी ईश्वराचे आभार मानत गावकऱ्यांसाठी आशीर्वाद मागितला, हे प्रभो! या गावातील लोक याच गावात राहून आनंदाने नांदोत. पुढे मजल-दरमजल करत ते दुसऱ्या गावात पोहचले. दुपारची वेळ झाली होती. ऊन्हाचा तडाखा आणि पोटातील भूक वाढली होती. ते एका झाडाखाली थांबले असताना काही गावकरी तेथे गोळा झाले. त्यांनी नानकदेवांचे तेज पाहून त्यांची विचारपूस केली. त्यांना भोजन आणि पाणी दिले. त्या दिवशी त्यांना तिथेच रह

वाचनाने घडतो माणुस

Image
 वाचनाने घडतो माणूस                                हसती दुनिया मराठी मध्ये मी सुंदर असा लेख वाचला. भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रकाशित झालेला हा सुंदर लेख खास आपल्यासाठी –  मित्रांनो, आपण अनेकदा हे ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, की 'वाचाल तर वाचाल' किंवा 'वाचनाने घडतो माणूस' अर्थात ही केवळ सुभाषितं नसून प्रत्यक्ष जीवन जगलेली माणसं इतिहासात आढळून येतात. अशाच काही थोर व्यक्तिमत्वांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे. छोट्या अब्राहमला पुस्तके वाचण्याची फार आवड होती. तो सतत काहीतरी वाचत असे. घरात आई स्वयंपाक करत असतानादेखील चुलीशेजारी बसून तो वाचन करत असे. कारण रात्रभर वाचण्यासाठी दिव्याचे तेल घालवणे त्यांना परवडत नव्हते. एकदा अब्राहमला वाटले, की आपण अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चरित्र वाचावे. त्याने अनेक ठिकाणी चौकशी केली; पण ते पुस्तक त्याला मिळाले नाही. असाच शोध चालू असताना त्याला कोणीतरी सांगितले, की गावातल्या एका श्रीमंत जमीनद
Image
  संकटाला सामोरे कसे जावे ? (सारांश)                              ‘संकटाला सामोरे कसे जावे?’ या बोधकथेतून स्वामीजींनी आपल्याला समजावलं की, जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात एखादे ध्येय गाठायचं असेल तर रस्त्यात येणार्‍या अडचणींवर मात करून आपल्याला पुढे जावंच लागतं. जर अडचणी आहेत,संकटं आहेत म्हणून आम्ही जर तिथेच थांबलो तर आपण आपलं निश्चित ध्येय गाठू शकणार नाही. याउलट जर आम्ही संकटावर मात करण्यात करण्याचा प्रयत्न करू तर संकट कधीच आडवे येणार नाही. मित्रांनो आपण टीव्हीवर, न्यूज पेपर मध्ये पाहत असतो, वाचत असतो,ऐकत असतो की कितीतरी लोक अडचणींना कंटाळून आत्महत्या करतात आपलं जीवन संपवतात. का बरं असं होतं ?  ईश्वरानं आम्हाला एवढा सुंदर, अमोलक जन्म दिला आहे, आमच्यासाठी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे तरीही मनात असा विचार का यावा ? मानवी जीवनामध्ये सुख-दुःख हे ऊन-सावलीप्रमाणे येत-जात असतं. माझं एखादं काम नाही झालं, माझ्या पिकांनी मला धोका दिला, एखाद्याने मला वाईट वागणूक दिली, अहो एवढंच काय लहान लहान मुलं सुद्धा आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून, मार्क कमी पडले म्हणून, नापास झालो म्हणून, आत

संकटाला सामोरे कसे जावे ?

Image
 संकटाला सामोरे कसे जावे ?   असे जगावे छाताडावर,आव्हानाचे लावूनी अत्तर नजर रोखूनी नजरेमध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर   कवी गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या कवितेच्या या ओळी वाचत असताना हसती दुनिया   मराठी मध्ये आलेला स्वामी विवेकानंद जी यांच्या व्याख्यानामधला एक प्रसंग आठवला. एकदा स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत असताना काशीला आले. काशीला ते एका रस्त्याने जात असताना मोठमोठी माकडं त्यांच्या पाठीमागे लागली. स्वामींना पुढे जाऊ द्यायचे नाही असे जणू माकडांनी ठरवले होते.स्वामीजी पुढे चालत असताना माकडं त्यांच्या अंगावर झेप घेऊ लागली. त्यांचे कपडे ओढू लागली. स्वामी विवेकानंद त्यांना पाहून घाबरले. ते पळू लागले. स्वामीजी जेवढ्या वेगाने पळत त्याच्या दुप्पट वेगाने माकडे पळू लागली. त्यांचे पाय ओढू लागली. त्यांच्या पायाला चावा घेऊ लागली. आता यांच्यापासून आपली काही सुटका नाही, या विचाराने स्वामीजी चिंतेत पडले. तेवढ्यात समोरुन एक खेड्यातील माणूस येत होता. तो स्वामींना म्हणाला, घाबरु नका आणि पळू नका. मागे फिरा माकडांच्या समोर खंबीरपणे उभे राहा. स्वामीजी थांबले. मागे वळले आणि माकडांच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहात