संकटाला सामोरे कसे जावे ?
(सारांश)


                             ‘संकटाला सामोरे कसे जावे?’ या बोधकथेतून स्वामीजींनी आपल्याला समजावलं की, जीवन जगत असताना अनेक अडचणी येतात एखादे ध्येय गाठायचं असेल तर रस्त्यात येणार्‍या अडचणींवर मात करून आपल्याला पुढे जावंच लागतं. जर अडचणी आहेत,संकटं आहेत म्हणून आम्ही जर तिथेच थांबलो तर आपण आपलं निश्चित ध्येय गाठू शकणार नाही. याउलट जर आम्ही संकटावर मात करण्यात करण्याचा प्रयत्न करू तर संकट कधीच आडवे येणार नाही. मित्रांनो आपण टीव्हीवर, न्यूज पेपर मध्ये पाहत असतो, वाचत असतो,ऐकत असतो की कितीतरी लोक अडचणींना कंटाळून आत्महत्या करतात आपलं जीवन संपवतात.

का बरं असं होतं ?

 ईश्वरानं आम्हाला एवढा सुंदर, अमोलक जन्म दिला आहे, आमच्यासाठी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली आहे तरीही मनात असा विचार का यावा ? मानवी जीवनामध्ये सुख-दुःख हे ऊन-सावलीप्रमाणे येत-जात असतं. माझं एखादं काम नाही झालं, माझ्या पिकांनी मला धोका दिला, एखाद्याने मला वाईट वागणूक दिली, अहो एवढंच काय लहान लहान मुलं सुद्धा आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून, मार्क कमी पडले म्हणून, नापास झालो म्हणून, आत्महत्या करतात. 

जीवन एवढं स्वस्त आहे का  हो ?

एकीकडे आम्ही वाचतो की ‘जीवन एक संघर्ष आहे!’ जगण्याची मजा तर संघर्षात आहे. इतिहासातील अनेक उदाहरणे आम्हाला वाचायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भारतात स्वातंत्र्याचा सूर्योदय व्हावा म्हणून लढलेले, बलिदान दिलेले असंख्य स्वातंत्र्यसैनिक अशा अनेक शूर वीर, पराक्रमी, महामानवांनी संघर्षाच्या मार्गाने संकटावर मात केली आणि आपले ध्येय गाठले आणि म्हणूनच आज यांची नावे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत.

 मित्रांनो इतिहास हा वाचण्यापुरता नसतो तर इतिहासातुन आम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा घ्यायची असते. चला तर मग मित्रांनो ईश्वराला धन्यवाद देऊयात की त्याने एवढा सुंदर नरदेह दिला आहे. म्हणून तक्रार करण्यापेक्षा परिस्थितीला दोष न देता संघर्ष करून स्वतःच्या वाटा स्वतः निर्माण करूयात आणि इतरांनाही अशी प्रेरणा देऊयात. म्हणून या सुंदर ओळीनी आज आपली रजा घेतो 

ये मत कहो खुदा से मेरी मुश्कीले बडी है,

इन मुश्कीलो से केह दो मेरा खुदा बडा है |

जर आपण या आधीची गोष्ट वाचली नसेल तर इथे क्लिक करा जी.....

🙏🙏🙏




Comments

Popular posts from this blog

दृष्टी

निसर्गाकडून शिकावे

संकटाला सामोरे कसे जावे ?