संकटाला सामोरे कसे जावे ?

 संकटाला सामोरे कसे जावे ?

 
असे जगावे छाताडावर,आव्हानाचे लावूनी अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर 

कवी गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या कवितेच्या या ओळी वाचत असताना हसती दुनिया मराठी मध्ये आलेला स्वामी विवेकानंद जी यांच्या व्याख्यानामधला एक प्रसंग आठवला.

एकदा स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत असताना काशीला आले. काशीला ते एका रस्त्याने जात असताना मोठमोठी माकडं त्यांच्या पाठीमागे लागली.
स्वामींना पुढे जाऊ द्यायचे नाही असे जणू माकडांनी ठरवले होते.स्वामीजी पुढे चालत असताना माकडं त्यांच्या अंगावर झेप घेऊ लागली. त्यांचे कपडे ओढू लागली. स्वामी विवेकानंद त्यांना पाहून घाबरले. ते पळू लागले. स्वामीजी जेवढ्या वेगाने पळत त्याच्या दुप्पट वेगाने माकडे पळू लागली. त्यांचे पाय ओढू लागली. त्यांच्या पायाला चावा घेऊ लागली.
आता यांच्यापासून आपली काही सुटका नाही, या विचाराने स्वामीजी चिंतेत पडले. तेवढ्यात समोरुन एक खेड्यातील माणूस येत होता. तो स्वामींना म्हणाला, घाबरु नका आणि पळू नका. मागे फिरा माकडांच्या समोर खंबीरपणे उभे राहा. स्वामीजी थांबले. मागे वळले आणि माकडांच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहात खंबीरपणे उभे राहिले तशी माकडं घाबरली आणि पळून गेली.
स्वामीजी म्हणतात, एक साधारण खेडूत जीवनाचं महान तत्वज्ञान शिकवून गेला, की संकटाला भिऊन पळू नये, तर संकटांचा सामना करावा. संकटाला घाबरुन पाळणाऱ्याच्या मागेच संकटं हात धुवून मागे लागतात.

संकटाला सामोरे कसे जावे ?(१)

🙏🙏🙏
या आधीची बोधकथा वाचवण्यासाठी इथे टच करा जी .


Comments

Popular posts from this blog

दृष्टी

निसर्गाकडून शिकावे